पनवेल ः वार्ताहर
गेल्या दोन दिवसांपासून पनवेल परिसराला मुसळधार पावसाने झोडपले असतानाही वर्षासहलीसाठी आडमार्गाने व पोलिसांच्या नजरा चुकवून आलेल्या 116 जणांचा जीव खारघर पोलीस व अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे बचावला आहे. या सर्वांची सुखरूप सुटका करण्यात आली.
खारघरमध्ये रविवारी (दि. 18) 116 पर्यटक वर्षासहलीसाठी आले होते. यामध्ये 78 महिला आणि पाच मुलांचाही समावेश होता, मात्र पावसाचा जोर वाढल्याने मोठ्या प्रमाणात पाणी डोंगराहून खाली वाहू लागले. त्यामुळे या पर्यटकांना बाहेर येण्यासाठी जागाच राहिली नाही. पाणी वाढल्याने त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. जीव मुठीत धरून ते इतरांशी संपर्क करू लागले. या घटनेची माहिती मिळताच खारघर पोलिसांसह अग्निशमन दलाचे जवान त्या ठिकाणी पोहचले आणि त्यांनी अडकलेल्या सर्व पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …