माणगाव ः प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माणगाव तालुक्यातील पन्हळघर येथे ग्रामस्थांच्या पुढाकाराने कोरोना व्हायरसला गावात येण्याआधी गावच्या वेशीजवळच नेस्तनाबूत करण्यासाठी कोरोना नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. ग्रामस्थांना गाव सोडण्यास बंदी घालण्यात आली असून वैद्यकीय कामासाठीच बाहेर जाण्याची परवानगी दिली जाते, तर जीवनावश्यक गोष्टींचा साठा करण्यासाठी आठवड्यातून एकदाच सकाळी 7 ते 11 वाजेदरम्यानच घरातील एकाच व्यक्तीने बाजारपेठेत जाण्याची ताकीद देण्यात आली आहे.
गावाबाहेरील व्यक्तीस प्रवेश निषिद्ध केल्याने पन्हळघर गावात येणार्या व्यक्तीस कोरोना नियंत्रण कक्षातून यावे लागत असल्याने कोरोनाला रोखण्यासाठी ग्रामस्थांनी स्तुत्य उपक्रम राबविल्याने प्रशासनाकडूनही पन्हळघर ग्रामस्थांचे विशेष कौतुक करण्यात आले. या वेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून कोरोना नियंत्रण कक्षाचे उद्घाटन सामाजिक नेते प्रमोद घोसाळकर, पंढरी शेडगे, सरपंच जाधव, गाव अध्यक्ष बयाजी करकरे, उपाध्यक्ष समाधान करकरे, राजन शिंदे आणि
ग्रामस्थांनी केले.