पनवेल ः रामप्रहर वृत्त
अलिबागचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे नुकतेच निधन झाल्याने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ठाकूर कुटुंबीयांचे सांत्वन केले.
माजी आमदार मधुकर ठाकूर यांचा 15 जुलैला 74वा वाढदिवस होता, मात्र जन्मदिनीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. प्रेमळ आणि सच्च्या स्वभावामुळे ते असंख्य सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या मनात घर करून राहिलेले एक सर्वस्पर्शी नेतृत्व होते. त्यांचे आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. मधुशेठ यांच्या निधनाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शोक व्यक्त केला होता. त्याचप्रमाणे त्यांच्यासह पेणचे आमदार रविशेठ पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, कामगार नेते महेंद्र घरत यांनी रविवारी (दि. 18) अलिबाग तालुक्यातील सातिर्जे गावी जाऊन ठाकूर कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …