Breaking News

नवरात्रोत्सवावर कोरोनाचे सावट

उरण : वार्ताहर

कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शाळा महाविद्यालये बंद आहेत. त्याचबरोबर अभ्यास व परिक्षाचे टेंशन मुलांवर असल्यामुळे यावर्षी तरुणाईला नवरात्र उत्सवाचे वेध लागले आहे. मात्र तरूणाईच्या आनंदावर कोरोनामुळे विरजण पडणार असल्यावे बोलले जात आहे. कोरोनासबंधी असलेले शासकीय नियमांचे पालन करूनच नवरात्रोत्सव साजरा करण्याबाबत सूचना दिल्या असल्याबाबत बोलले जात आहे.

गणेशोत्सवाची धुम संपल्यामुळे आता तरुणाईला वेड लागले  आहे ते नवरात्रोत्सवाचे. हा उत्सव शनिवारी (दि. 17) असल्याने देवीच्या मूर्ती तयार करणार्‍या कारखान्यांमध्ये कारागिरांची लगबग सुरू झाली आहे. उरण शहरातील राजपाल नाका येथील जगे यांचे सिद्धीविनायक कला केंद्रात भावना पाटील, यामिनी माळवी हे मूर्ती सजविण्यात मग्न आहेत असे श्रीमती जगे यांनी सांगितले

या वर्षी सोशल डिस्टन्सिंग, तोंडावर मास बांधणे आदी नियमावरच गरबा, दांडिया याबरोबरच कोणतेही मनोरंजानात्क कार्यक्रम न घेता आरोग्य शिबिरासारखे समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन मंडळांनी घ्यावेत, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक मंडळाचे देवी स्थापनेनंतर चारच्या वर कार्यकत्यांनी मंडपात थांबू नये. खाद्य पदार्थ व पेयजल मंडपात करू नये, ऑनलाइन दर्शनाची सोय ठेवावी तसेच देवीचे विसर्जन करताना प्रतिबंधात्मक क्षेत्रात देवीचे विसर्जन करू नये तसेच मूर्ती स्थापनेसाठी आणताना व विसर्जनासाठी घेऊन जाताना मिरवणूक काढू नयेत अशा प्रकारच्या सूचना मंडळांना पोलीस विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

दरवर्षी सात फूट उंचीची मूर्ती असते. मात्र यावर्षी शासनाने सांगितल्यानुसार चार फुट उंच देवीच्या मूर्तीची स्थापना करणार आहोत. शासनाकडून आलेल्या सर्व नियमांचे पालन करीत यावर्षीचा नवरात्र उत्सव साजरा करणार आहोत. तरुणाईचा जोश पहाता त्यांना थांबविणे हेच मोठे मंडळाच्या कार्यकर्त्यांपुढे आव्हान असेल तरीही गावाच्या आरोग्याच्या दृष्टीने मंडळाच्या वतीने सर्वतोपरी खबरदारी घेणार आहोत यंदा आरोग्य शिबिर, रक्तदान शिबीर घेण्यात येणार असल्याचे उरण शहरातील बोरी गावातील नवदुर्गा नवरात्रोत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष नंदन पानसरे यांनी सांगितले.

Check Also

महायुतीचे उमेदवार खासदार बारणेंच्या प्रचारार्थ खारघरपासून ते कळंबोलीपर्यंत भव्य रोड शो

पनवेल : रामप्रहर वृत्त महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी खारघरपासून ते कळंबोलीपर्यंत भव्य …

Leave a Reply