Breaking News

‘इंडियन ऑइलटँकिंग’ची शेजारधर्म मोहीम

कोविड काळात उरणकरांना दिला मदतीचा हात

उरण : विशेष प्रतिनिधी

‘इंडियन ऑइलटँकिंग’ची शेजारधर्म मोहीम उरणमधील धुतूम, रांजणपाडा, जसखार व चिर्ले या चार गावांत राबवण्यात आली. कोविड साथीचा मुकाबला करणार्‍या रायगड जिल्ह्यातील या चार गावांत 1263 लसीकरणे व बोकडविरा कोविड सेंटरला 400 लिटर ऑक्सिजनच्या टाक्या पुरवत ‘इंडियन ऑइलटँकिंग’ने जिल्ह्याशी असलेली सामाजिक बांधिलकी दाखवली आहे. 15 लिटर ऑक्सिजनची गरज असलेल्या 26 रुग्णांना पुरेल अशी सोय यामुळे बोकडविर्‍यातील कोविड केंद्रात झाली. मागील आठवड्यात कंपनीने नजीकच्या चार गावांत लसीकरण शिबिरे भरवून 1263 नागरिकांना पहिली लस पुरवत उरण तालुक्यातील गावपाड्यांत लसीकरण करून जिल्हा प्रशासनाच्या लसीकरण नियोजनात हातभार लावला. 

जेएनपीटी मार्गावर असलेल्या पेट्रोलियम टर्मिनल माध्यमातून कोविडच्या पहिल्या लाटेतही गेल्या वर्षी येथील नागरी वस्त्यांमधील सुमारे 600 कुटुंबांना शिधा, मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे. उरण तालुक्यातील गावांसाठी शिधा व रुग्णवाहिका साहाय्य व धुतूम गावासाठी घनकचरा प्रकल्प, चिर्ले गावासाठी कचरा संकलन करण्यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत कचरागाडी देण्यात आली. चिर्ले ग्रामपंचायतीला कंपनीने वाहन दिले. या वेळी उरणचे आमदार महेश बालदी हेही उपस्थित होते.

आसपासच्या रोजंदार व असंघटित कामगारांसाठी अपोलो रुग्णालयाच्या विद्यमाने लसीकरण शिबिर घेण्यात आले. या वेळी कंपनीचे मनुष्यबळ प्रमुख नवीन चंद्रा म्हणाले की, रोजंदारीवर गुजराण करणार्‍या कुटुंबात संसर्ग झाल्यास आख्ख्या कुटुंबाचे आर्थिक नियोजन कोलमडू शकते. या लसीकरणातून निदान एक तरी लस लाभल्याने तालुक्यात तिसर्‍या लाटेचा धोका कमी करण्यात आम्ही हातभार लावल्याचे समाधान आहे. दुसर्‍या लसीकरणाचे वेळापत्रक आखून या लाभार्थींचे लसीकरण पूर्ण करण्यात येईल.

कोविड काळात इंडियन ऑइलटँकिंगने रायगड जिल्ह्यात अनेक विकासकामे केली असून यात जिल्हा प्रशासनास कोविड लढ्यात आर्थिक मदत, उरण तालुक्यातील गावांसाठी शिधा व रुग्णवाहिका साहाय्य व धुतूम गावासाठी घनकचरा प्रकल्प, चिर्ले गावासाठी कचरागाडी यांचा समावेश आहे.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply