पनवेल : वार्ताहर
शहरातील प्रभाग क्रं. 19 मधील एम.जी. रोड, टपाल नाका येथील माधव मेडिकल जवळ, तसेच पांजर पोळ रोडवर नगरसेवक राजु सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे स्वीय सहाय्यक मंदार देसाई यांनी महापालिका कर्मचार्यांकडून सपाई करून घेतली.
या परिसरात कचर्यामुळे दुर्गंधी पसरली होती. येथून जाताना दुर्गंधी येत होती. त्यामुळे नगरसेवक राजु सोनी यांच्या यांच्या प्रयत्नाने पनवेल महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षंक शैलेश गायकवाड व महेंद्र भोईर यांनी लगेच सफाई कर्मचारी व घंटागाडी बोलवून या परिसरातील कचरा उचलून नेला. त्या दोन्ही ठिकाणी झाडांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या व काही दिवसांकरिता दोन्ही ठिकाणी सफाई कर्मचारी नेमण्यात आले. तसेच रोज घंटागाडी येणार असून सर्वांनी आपला कचरा घंटागाडीतच टाकावा, असे नागरिकांना व व्यापारी वर्गाला आवाहन करण्यात आले. या वेळी परिसरातील युनियन हॉटेलचे मालक सुनील खळदे, प्रदीप मखिजा, किरण नाईक व अन्य नागरिक, व्यापारी उपस्थित होते. त्यांनी नगरसेवक राजू सोनी व मंदार देसाई यांचे आभार मानले.