Breaking News

अंगणवाडी, आशा सेविकांचे कोरोना युद्धात महत्त्वाचे योगदान

उरण : वार्ताहर

कोरोना युद्धात अंगणवाडी सेविका व आशा सेविका महत्त्वाचा दुवा ठरत आहेत. अल्प मानधनात काम करणारा हा घटक कोरोना सर्व्हेमध्ये शासनाच्या आरोग्य यंत्रणेवरील ताण हलका करत आहे. घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका व आशा सेविका घरातील प्रत्येक सदस्याचा सर्व्हे व थर्मल स्क्रिनिंग करत आहेत. तसेच जनजागृतीचे कामही करत आहेत. अल्प मानधन घेणार्‍या अंगणवाडी सेविका व अति अल्प मानधन घेणार्‍या आशासेविका मजूरांचा सर्व्हे, आदिवासींचा सर्व्हे तसेच त्यांना शासनाचा रेशन पुरविण्यासाठी आवश्यक कागदपत्र गोळा करणे, आदी काम त्यांनी करुन शासन व गरीब जनतेमधील त्या दुवा ठरल्या आहेत. तसेच कोरोनाबाबत जनजागृती करण्यात ही त्यांनी भूमिका निभावली आहे. अंगणवाडी व आशा सेविकांनी आरोग्य सर्व्हेचे काम हाती घेतला असून त्यात त्या प्रत्येक घराला भेट देऊन घरातील प्रत्येक सदस्याची विचारपूस करुन त्यांना सर्दी खोकला, ताप हा आजार आहे का याची चौकशी करत आहेत. तसेच प्रत्येकाची थर्मल स्कॅनिंग ही करत आहेत. त्यामुळे कोरोना संशयित शोधण्यात व त्यावर उपाययोजना करण्यात शासनाला सहज सोपे होत आहे. आणि हे सर्व करत असताना शासनातर्फे मात्र त्यांना कोणतेही संरक्षण देण्यात आले नाही हे विशेष. तरीही अंगणवाडी सेविका व आशा सेविका आपल्या जिवावर उदार होऊन आपले कर्तव्य पार पाडताना दिसत आहेत.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply