Breaking News

‘आर्या प्रहर’चा आठवा वर्धापन दिन साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त

साप्ताहिक आर्या प्रहरचा आठवा वर्धापन दिन दुर्मिळ वनौषधी रोपे भेट देऊन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ‘आर्या प्रहर’चे संपादक सुधीर पाटील, पत्रकार दत्तू कोल्हे यांच्या हस्ते 250 दुर्मिळ वनौषधी रोपे भेट देण्यात आली, तसेच मनीषा साठे यांच्या हस्ते कळंबोली येथे वनौषधी रोपे लावण्यात आली. संपादक सुधीर पाटील यांनी ‘आर्या प्रहर’च्या कार्याची व वनौषधी रोपांच्या औषधी गुणधर्माची माहिती दिली.

या वेळी ‘किल्ले रायगड’चे संपादक प्रमोद वालेकर, शुभांगी वालेकर, ‘आर्या प्रहर’चे दत्तू कोल्हे, अ‍ॅड. प्रगती ठाकूर, समाजसेवक उज्ज्वल पाटील, निसर्गप्रेमी सखाराम साठे, मनीषा साठे, निसर्गोपचार तज्ज्ञ ऋतुजा वालेकर, आर्ट अ‍ॅण्ड हॉबीज फाउंडेशनच्या चेअरमन सारिका बिरारी, आर्या वनौषधी संस्थेच्या रुद्रा बिरारी, डॉ. अशोक तांबेकर, तथास्तु ज्वेलर्सचे संजय बिरारी, बालाजी कुंचमवार, मंथन साठे, पत्रकार विक्रम येलवे आदी उपस्थित होते.

Check Also

संत रोहिदास महाराज जयंती भाजपतर्फे विविध कार्यक्रमांनी होणार साजरी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तसंत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त …

Leave a Reply