खोपोली : प्रतिनिधी
दिराने वहिनीवर बळजबरी करीत दोनदा अत्याचार केल्याची घटना खालापूर तालुक्यातील ढेकू गावात घडली असून नराधम दिराला पोलिसांनी अटक केली आहे. या नराधमाला 17 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
पीडित महिला ही पती, मुले आणि दिरासह शंकर ढेकू गावातील मंदिरसमोर राहते. घरामध्ये पती व मुलांसह झोपली असताना दिर चौरासिया याने संभोग केला. पीडितेला वाटले की, तीचा पती आहे, परंतु जाग आल्यावर दिराला पाहून ती मोठ्याने ओरडली, असता त्याने तिचे तोंड दाबून पुन्हा जबरी संभोग केला. पीडितेने सर्व घटना पतीला सांगितल्यानंतर खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
या गुन्ह्यातील आरोपी दिरास अटक करण्यात आली असून, त्याच्या विरोधात भा. दं. वि. कलम 376(2)(एन),506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला सहाय्यक निरीक्षक पाडोळे या करीत आहेत.