Breaking News

सिडकोच्या विशेष गृहनिर्माण योजनेच्या नोंदणीचा प्रारंभ

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, सिडकोने महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचारी विशेष गृहनिर्माण योजनेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीचा प्रारंभ रविवारी (दि. 15) झाला. त्याचप्रमाणे, भूखंड विक्रीच्या अन्य दोन योजनांचाही प्रारंभ या दिवशी करण्यात आला.

या योजनेकरिता अर्जदारांची ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 15 ऑगस्ट 2021 ते 7 सप्टेंबर 2021 या कालावधीत होणार आहे, तर योजनेची संगणकीय सोडत 16 सप्टेंबर 2021 रोजी काढण्यात येणार आहे. योजनेच्या सविस्तर माहितीकरिता अर्जदारांनी हीींिीं://श्रेीींंशीू.लळवलेळपवळर.लेा या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे (स्कीम बुकलेट) काळजीपूर्वक अवलोकन करावे.

भूखंड विक्रीच्या उपरोक्त दोन योजनांपैकी एका योजनेंतर्गत नवी मुंबईतील खारघर, कळंबोली, नवीन पनवेल (पू.) आणि नवीन पनवेल (प.) नोडमधील निवासी, निवासी तथा वाणिज्यिक वापराचे एकूण 16 भूखंड भाडेपट्ट्यावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर दुसर्‍या योजनेंतर्गत नवी मुंबईतील उलवे, पुष्पक नगर, खारघर, नवीन पनवेल (पू.) आणि कळंबोली नोडमधील एकूण 8 भूखंड हे इंधन भरणा केंद्र (पेट्रोल पंप/सीएनजी स्टेशन) वापराकरिता भाडेपट्ट्याने उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

दोन्ही योजना या ई-निविदा तथा ई-लिलाव पद्धतीने पार पडणार असून योजनांच्या सविस्तर माहितीकरिता अर्जदारांनी हीींिीं://शर्रीलींळेप.लळवलेळपवळर.लेा या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार्‍या योजना पुस्तिकेचे काळजीपूर्वक अवलोकन करावे. अधिकाधिक कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचार्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. भूखंड विक्रीच्या अन्य दोन योजनांद्वारे अनुक्रमे शहरातील बांधकाम क्षेत्राला चालना मिळण्यासह विविध नोड्समध्ये पेट्रोल पंप/गॅस स्टेशन सुविधा उपलब्ध होणार आहेत, असे सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply