पंढरपूर ः प्रतिनिधी
जेवढी गर्दी बारमध्ये होते त्यापेक्षा कमी गर्दी मंदिरात होते. सोशल डिस्टन्स ठेवून मंदिरे उघडण्यास काय हरकत आहे, असा सवाल विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि. 17) पंढरपूर येथे केली. माजी आमदार दिवंगत सुधाकर परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी फडणवीस आले होते. त्या वेळी ते माध्यमांशी बोलत होते. आम्हा हिंदूंचे 33 कोटी देव आहेत, आम्हाला कुठेही देव भेटतो, मात्र अनेक गरीब लोकांची उपजीविका मंदिरावर अवलंबून आहे. हारवाला ते पुजारी असंख्य गरीब लोकांची उपजीविका मंदिरावर अवलंबून आहे. त्यांच्यासाठी मंदिरे उघडा. तुम्ही दारूची दुकाने उघडी ठेवता, मात्र मंदिरे बंद ठेवता म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला. शाळांच्या बाबतही राज्य सरकार गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचा फटका विद्यार्थी आणि पालकांना बसत आहे. शाळेबाबत धरसोड धोरण न ठेवता एक निश्चित धोरण राबविल्यास पालक आणि विद्यार्थी संभ्रमात राहणार नाहीत, असा टोला फडणवीस यांनी लगावला. या वेळी खासदार रणजित निंबाळकर, जयसिद्धेश्वर स्वामी, आमदार प्रशांत परिचारक, समाधान आवताडे, रणजितसिंह मोहिते पाटील, विजय देशमुख, राहुल कुल, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, गोपीचंद पडळकर उपस्थित आदी होते.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …