Breaking News

शिवाजीनगर येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र

रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबवत असते. अशाच प्रकारे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य तथा भाजप महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांच्या हस्ते बुधवारी (दि. 1) झाले.
गव्हाण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हद्दीतील प्रत्येक गावात लसीकरण केंद्र सुरू करण्यात येत आहे. नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे कवच मिळावे या उद्देशाने ग्रामपंचायतीच्या 25 लाख निधीतून लसीकरणाची केंद्र सुरू करण्यात येत आहे. त्या अंतर्गत यापूर्वी गव्हाण आणि कोपर येथे लसीकरण केंद्र सुरू झाले असून, बुधवारी शिवाजीनगर येथील जिल्हा परिषद शाळेत लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रावर कोविशिल्ड लसीचे डोस नागरिकांना देण्यात येणार आहेत.  
या केंद्राच्या उद्घाटनावेळी गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, माजी उपसरपंच सचिन घरत, ग्रामपंचायत सदस्य रोशन म्हात्रे, हेमंत पाटील, योगिता भगत, सुनीता घरत, कामिनी कोळी, ग्रामविकास अधिकारी एम. डी. पाटील, शिवाजीनगर ग्रामस्थ मंडळ उपाध्यक्ष व्ही. के. ठाकूर, जी. के. ठाकूर, तुळशीदास ठाकूर, सुरेश म्हात्रे, शिवाजी ठाकूर, किशोर ठाकूर, नंदा ठाकूर, आशा म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply