Breaking News

छगन भुजबळांचे राहते घरही बेनामी

किरीट सोमय्यांचा आरोप

नाशिक ः प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आपल्या परिवारासोबत ज्या घरात राहतात, ती नऊ मजली इमारतही बेनामी आहे. त्या इमारतीशी तुमचा संबंध काय हे भुजबळांनी स्पष्ट करावे, अशी मागणी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. नाशिक येथे बुधवारी (दि. 1) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भुजबळांच्या नऊ मजली महालाचा मालक कागदावर परवेझ कन्स्ट्रक्शन प्रा. लि. आहे. परवेझ कन्स्ट्रक्शनशी तुमचा संबंध काय? त्यांना तुम्ही भाडे देता की त्यांच्याकडून विकत घेतले आहे? अशी विचारणा करून परवेझ कंपनीसोबतच इतरही काही कंपन्यांची नावे सोमय्या यांनी घेतली आणि या कंपन्या बोगस असल्याचा आरोप केला आहे. ते पुढे म्हणाले, या कंपन्या चालवणार्‍या लोकांना ईडीने अटक केली होती. आयकर विभागाने त्यांचे स्टेटमेंट घेतल्यावर त्यांनी सांगितले की, भुजबळांनी आम्हाला रोख पैसे दिले व ते आम्ही या कंपन्यांमध्ये टाकले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी भुजबळांच्या संपत्तीची माहिती द्यावी.
मालेगाव, खारदांडा, पनवेल या ठिकाणी छगन भुजबळ यांची प्रचंड प्रमाणात बेनामी संपत्ती आहे, असा आरोपही सोमय्या यांनी या वेळी केला. त्यांच्या संपत्तीपैकी एका ठिकाणी भेट दिल्याचे त्यांनी सांगितले, तसेच शनिवारी आपण भुजबळांच्या राहत्या घरी भेट देणार असल्याचे म्हटले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply