पनवेल : रामप्रहर वृत्त
गव्हाण ग्रामपंचायतीच्या वतीने बेलपाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शुक्रवारी (दि. 3) कोरोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पनवेल पंचायत समितीच्या सदस्य रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती होती.या वेळी गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, माजी उपसरपंच सचिन घरत, ग्रामपंचायत सदस्य रोशन म्हात्रे, हेमंत पाटील, अरुण कोळी, पंकज पाटील, योगिता भगत, सुनिता घरत, शिल्पा कडू, कामिनी कोळी, गिरिजा कातकरी, वामन म्हात्रे, द्वारकानाथ पाटील, संतोष म्हात्रे, प्रसाद म्हात्रे, अतिश पाटील, महेश पाटील, सतीश म्हात्रे, गोरक्षनाथ कडू, प्रकाश कोळी, अभय म्हात्रे, मुख्याध्यापक चंद्रकांत पाटील, शशिकांत म्हात्रे, प्रदीप म्हात्रे यांच्यासह बेलपाडा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
पनवेल मनपा प्रभाग क्रमांक 20मध्ये केंद्राचा शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका हद्दीतील ग्रामीण भागात सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रयत्नाने आठवडाभर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत प्रभाग क्र. 20मध्ये शुक्रवारी (दि. 3)लसीकरण केंद्राचा शुभारंभ झाला.
भिंगारी गावात कराडी सामाजिक हॉलमध्ये लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राला नगरसेविका चारुशीला घरत, नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांडपिळे यांनी भेट दिली. या वेळी भाजपचे गाव अध्यक्ष जगदिश परदेशी, किसान मोर्चाचे पनवेल मंडल अध्यक्ष रूपेश परदेशी, गाव सरचिटणीस पंकज डावलेकर, ज्येष्ठ नेते अशोक परदेशी, शंकर म्हात्रे, बी. आर. परदेशी, किरण मढवी, सुरज परदेशी, पद्माकर पालव, स्वप्नाली परदेशी आदी उपस्थित होते. भिंगारी व कांदेवाडी येथे 400हून अधिक जणांचे लसीकरण करण्यात आले. या वेळी चारुशीला घरत म्हणाल्या की, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अजय बहिरा यांच्या प्रयत्नांतून हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.
