टोकियो ः वृत्तसंस्था
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताची चमकदार कामगिरी सुरूच असून, शनिवारी (दि. 4) भारतीय खेळाडूंनी दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी चार पदके जिंकली. त्यामुळे भारताच्या खात्यात आता 17 पदके झाली आहेत.
भारतासाठी शनिवार अतिशय खास दिवस ठरला. आधी भारताच्या मनीष नरवाल आणि सिंहराज अधाना यांनी पी 4 मिश्रित 50 मीटर पिस्तूल एसएच 1 नेमबाजीमध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक मिळवले. 19 वर्षीय नरवालने 218.2 गुण मिळवत पॅरालिम्पिकमध्ये विक्रम केला आहे, तर मंगळवारी कांस्यपदक जिंकणार्या सिंहराजने आता 216.7 गुणांसह रौप्यपदक जिंकले.
यानंतर पुरुषांच्या एसएल 3 प्रकारात जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने अंतिम फेरीत ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलला पराभूत करीत सुवर्णपदक जिंकले. तर याच प्रकारात मनोज सरकारने जपानच्या डेसुके फुजीहाराला पराभूत करीत कांस्यपदक पटकावले. सर्व पदकविजेत्या खेळाडूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन आणि कौतुक केले.
Check Also
पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे
आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …