Breaking News

शेकाप उमेदवार करुणा नाईक समर्थकांसह भाजपमध्ये

शिवसेना उबाठा पदाधिकार्‍यांनीही हाती घेतले ‘कमळ’

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक 9मधील शेकाप उमेदवार करुणा नाईक यांच्यासह माजी सरपंच आणि अनेक पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी (दि. 2) भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला, तर प्रभाग 2मधील ‘उबाठा’ पदाधिकार्‍यांनीही भाजपचे ‘कमळ’ हाती घेतले.
या पक्षांतरामुळे पनवेलमध्ये भाजपची ताकद अधिक वाढली असून विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. महापालिका प्रभाग क्रमांक 9मधील शेकापच्या उमेदवार करुणा नाईक, आसुडगावचे माजी सरपंच नंदकुमार नाईक, माजी सरपंच विजय भोपी, माजी नगरसेवक सुनील नाईक यांंनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचप्रमाणे प्रभाग 2मधील शिवसेना उबाठाचे तळोजा उपविभागप्रमुख हरेश पाटील, तोंडरे उपशाखाप्रमुख वासुदेव पाटील, सुशांत नाईक, नरेंद्र नाईक, तेजस घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांनी पक्षात स्वागत केले.
भाजपच्या पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास जिल्हा सरचिटणीस तथा विनविरोध विजयी झालेले नगरसेवक नितीन पाटील, भाजप महायुतीचे प्रभाग क्रमांक 9चे उमेदवार शशिकांत शेळके, प्रतिभा भोईर, महादेव मधे; प्रभाग क्रमांक 2 चे उमेदवार कृष्णा पाटील, महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभूदास भोईर, शंकुनाथ भोईर, सुरेश भोईर, महेश पाटील, अमर उलवेकर, निलेश भोईर, संज्योत शेळके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत झालेल्या या पक्षांतरामुळे शेकाप आणि शिवसेना उबाठाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply