Breaking News

पनवेलचा कुस्तीपटू शंकर जाधवला सुवर्णपदक

आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या कला शाखेतील द्वितीय वर्षात शिकत असलेल्या शंकर सखाराम जाधव या विद्यार्थ्याने नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या नॅशनल स्टुडंट ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. यासोबतच दुबई येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघाचा प्रतिनिधी म्हणून शंकरची निवड झाली आहे.

या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, चेअरमन डॉ. अनिल पाटील, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन रामशेठ ठाकूर, अरुणशेठ भगत, जे. एम. म्हात्रे, महेंद्र घरत, संस्थेचे सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर, सहसचिव डॉ. प्रतिभा गायकवाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, उपप्राचार्य डॉ. राजाराम पाटील, डॉ. नरेश मढवी, डॉ. अनिल रोकडे तसेच जिमखाना विभागाचे प्रमुख डॉ. प्रफुल्ल वशेणीकर यांनी शंकर जाधवचे अभिनंदन केले आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply