कर्जत : बातमीदार
नवी मुंबईतील श्री साई ट्रस्टकडून नेरळ भागातील चार आदिवासीवाड्यांमधील कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील आनंदवाडी येथील प्राथमिक शाळेत शिकत असलेल्या 109 आदिवासी विद्यार्थ्यांना श्री साई ट्रस्टतर्फे ट्रस्टच्या डॉ. निर्मला राव, जयश्री जेठवानी यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य आणि खाऊ यांचे वाटप देण्यात आले. त्यानंतर नेरळ परिसरातील आनंदवाडी, फणसवाडी, आंबेवाडी, ढाकीचामाळ येथील 163 आदिवासी कुटुंबांना ट्रस्ट तर्फे धान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी डॉ. निर्मला राव यांनी उपस्थितांना ट्रस्टच्या कामाची माहिती दिली.
नेरळ ग्रामपंचायत सदस्य मंगेश म्हसकर, ट्रस्टचे कार्यकर्ते दिलीप घुले तसेच शिक्षक प्रदीप सैदाणे यांच्यासह स्थानिक आदिवासी कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.