Breaking News

आमदार महेश बालदी यांच्याकडून प्रो कबड्डीपट्टू मयूर कदमचे अभिनंदन

उरण ः वार्ताहर

उरण तालुक्यातील बोकडवीरा गावचा गणेश क्लबकडून कबड्डी खेळणारा खेळाडू मयूर कदम याची प्रो कबड्डी लीगसाठी बंगळुरू बुल्स संघात निवड झाली आहे. याबद्दल आमदार महेश बालदी यांनी मयूरचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष व नगरसेवक रवी भोईर, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शेखर पाटील, भाजप तालुका सरचिटणीस सुनील पाटील यांच्यासह गणेश क्लबचे सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply