Breaking News

खांदा कॉलनीत छत्रपती संभाजीराजेंची जनसंवाद यात्रा

पनवेल : वार्ताहर

मराठा क्रांती मोर्चा-रायगड तर्फे आयोजित छत्रपती संभाजीराजे यांची जनसंवाद यात्रा खांदा कॉलनी येथे मंगळवारी आली होती. या वेळी खांदा कॉलनीच्या मराठा समाज बांधवानी डोक्यावर घातलेले भगवे फेटे व शिस्तबद्ध नियोजन याचे राजेंनी विशेष कौतुक केले. सकल मराठा समाज खांदा कॉलनीच्या आरक्षण लढ्याच्या चळवळीतील सहभागबाबत खांदा कॉलनीच्या समाज बांधवांचा खांदा लागल्याशिवाय हा आरक्षणाचा लढा अपूर्ण असल्याचे सांगितले. या दौर्‍यावेळी सकल मराठा समाज खांदा कॉलनी व मराठा उद्योजक सारथीच्या लोगोचे अनावरण राजेंच्या हस्ते झाले. या वेळी रायगड जिल्हा समन्वयक व खांदा कॉलनीतील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply