कळंबोली : प्रतिनिधी
कळंबोली शहरामध्ये गुरुवारी (दि. 11) पहाटेच्या सुमारास ऑटो स्पेअर पार्टच्या दुकानाला आग लागण्याची घटना घडली. या आगीमध्ये विविध प्रकारचे स्पेअर पार्ट ऑइल यासारखी सामुग्री आगीमध्ये जळून खाक झाले.
एलजी 1 रूम नंबर ई 8 सेक्टर 3 याठिकाणी ही घटना घडली. यावेळी अग्निशामक दलाचे चार अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन ही आग संपूर्ण नियंत्रणात आणली. या आगीमध्ये सुदैवाने कोणत्या प्रकारची जीवित हानी झालेली नसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शॉक सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
या वेळी अग्निशामक दल अधिकारी डी. टी. पाटील यांच्यासह फायरमन ए. आर. दळवी, एस. पाटील, पी. सी. वाघ व पी. सी. सोंडे यांनी घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली. बर्याच वेळ सदनिकांचा वापर गाळ्यांसाठी करून, असे व्यवसाय केले जात असतात, मात्र अशा घटना घडल्यानंतर आजूबाजूला असलेल्या रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित राहत असतो.