Breaking News

पोलीस असल्याचे सांगत फसविणार्याला खालापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

खालापूर : प्रतिनिधी

खालापुरातील ज्येष्ठ नागरिकाला पोलीस अधिकारी असल्याचे सांगत दम देत पाऊण लाखाचा ऐवज लुटणार्‍या अबालू जाफर इराणी (वय 47 वर्ष, रा. विष्णू कृपानगर शिवाजीनगर, पुणे) तोतयाला खालापूर पोलीस पथकाने नगर जिल्ह्यातून अटक केली आहे. इराणीने राज्यात अनेक ठिकाणी तोतया पोलीस अधिकारी बनून गुन्हे केल्याचे तपासात समोर येत आहे.

अशोक हरी प्रधान (वय 72 वर्ष, रा. खोपोली लक्ष्मीनगर, 8/2 घरकुल बंगला, ता. खालापूर) हे दुचाकीवरून पळसदरी येथे मठात जात असताना मस्त मालवणी हॉटेलजवळ अबुला इराणी यांनी प्रधान यांना थांबवले. इराणी यांनी पोलीस अधिकारी असल्याचे सांगत प्रधान यांना दम देत अंगावर सोनं घालून कशाला फिरता जिवाला धोका आहे, असे सांगितले. प्रधान यांचे मोबाईल, पैशाचे पाकीट, सोन्याचे दागिने काढून रूमालात बांधून ठेवा, असे सांगत रुमालाची गाठ बांधण्याचा बहाणा करत इराणीने हातचलाखीने रुमाल अदलाबदल केली. जवळपास पाऊण लाखाचा ऐवज घेऊन तोतया इराणीने पळ काढला. 

प्रधान यांनी खालापूर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिल्यानंतर पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक आरोपीच्या मागावर होते.सहाय्यक पोलीस निरिक्षक शेखर लव्हे, पोलीस हवालदार पंकज खंडागळे, पोलीस नाईक रणजीत खराडे, दत्तात्रेय किसवे, विशाल सावंत, पोलीस शिपाई अक्षय लोखंडे यांनी गुप्त माहितीच्या आधारे नगरमधील श्रीरामपूर येथून अबुला इराणीला ताब्यात घेतले. अबुला याला चार दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply