खारघर : रामप्रहर वृत्त
जागतिक न्युमोनिया दिनानिमित्त खारघरमध्ये शुक्रवारी (दि. 12) या एसएएएनएस कॅम्पिंग या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर यांच्या हस्ते खारघरच्या येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित एसएएएनएस कॅम्पिंगचे उद्घाटन
करण्यात आले.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने 12 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारीदरम्यान एसएएएनएस कॅम्पिंग आयोजित करण्याच्या सुचना देण्यात आले आहेत. त्यानुसार पनवेल महानगरपालिकेच्या आदेशानुसार हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये बालनिमोनिया प्रतिबंधात्मक पीसीव्ही लसीकरण करण्यात येणार आहे.
या वेळी प्रभाग समिती ‘अ’च्या सभापती अनिता पाटील, नगरसेविका नेत्रा किरण पाटील, संजना समीर कदम, भाजप खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे, वैद्यकीय सेलचे संयोजक किरण पाटील, युवा नेते समीर कदम, पूर्व सैनिक सेलचे गजे सिंह, पनवेल महानगरपालिका मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, आरोग्य अधिकारी डॉ. चांडक, डॉ. अश्विनी देगावकर, डॉ. विनायक देशमुख आदी उपस्थित होते.