पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यासह मित्रपक्ष महायुतीचे मावळ लोकसभेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. या प्रचाराच्या पार्श्वभुमीवर रविवारी (दि. 28) नवीन पनवेल परिसरात भव्य बाईक रॅली काढण्यात आली होती. या रॅलीची सांगता ही दक्षिण भारतीय समाज संमेलनात झाली. या संमेलनात महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना एकमताने पाठिंबा जाहीर करण्यात आला.
दरम्यान, श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी काढण्यात आलेल्या बाईक रॅलीमध्ये शेकडे तरुण महायुतीतील आपापल्या पक्षाचे झेंडे घेऊन सहभागी झाले होते. रॅलीमधील विजया रथावर खासदार बारणे, यांच्यासह आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते. चौका-चौकात फटाके वाजवून, पुष्पवृष्टीमध्ये सुवासिनींकडून औक्षण करण्यात येत होते. मोदींचा मुखवटा परिधान केलेल्या युवकही रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीमध्ये रिक्षाचालकांचा सहभाग ही उल्लेखनीय होता. काही तरुण-तरुणींनी कोळी नृत्य सादर करत बारणे यांचे जोरदार स्वप्न रस्त्याच्या दुतर्फा जमा झालेल्या जनसमुदायाला बारणे यांनी अभिवादन करून मतदारांचे आशीर्वाद घेतले.
या बाईक रॅलीची सांगता ही पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती संतोष शेट्टी यांनी आयोजीत केलेल्या दक्षिण भारतीय समाज संमेलनात झाली. या ठिकाणी उपस्थित असलेल्या दक्षिण भारतीयांनी लोकसभा निवडणूकीसाठी श्रीरंग बारणे यांना एकमताने पाठिंबा जाहीर केला.
या बाईक रॅलीला तसेच दक्षिण भारतीयांचा संमेलनाला खासदार श्रीरंग बारणे, भाजपे मावळ लोकसभा निवडणुक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस अॅड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, संतोष शेट्टी, समीर ठाकूर, तेजस कांडपीळे, अक्षय सिंग, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्षा राजश्री वावेकर, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, भास्कर शेट्टी, युवा नेते हॅप्पी सिंग, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अभिषेक भोपी, युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, नितेश पाटील, जयेश नांबीराय, योगेश कोठारी, सुजित कोठियाल, रवी पिल्ले, शंकर राव, श्वेता शेट्टी, आशा शेट्टी, यमुना प्रकाशन, गौरव नाईक, प्रवीण मोरबाळे, प्रशांत शेटे, स्वरूप मुंबईकर, मयूर आंग्रे, अक्षय सिंग, आकाश बैद यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दक्षिण भारतीय समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड
जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …