Breaking News

विचुंबे-देवद 11 संघ आरपीएलचा मानकरी

पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या 177व्या जयंतीनिमित्त अचानक मित्र मंडळाने शिरढोण येथे आयोजिलेल्या रायगड प्रीमियर लीगमध्ये विचुंबे-देवद 11 संघाने बाजी मारली. त्यांना तीन लाख एक रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.
आरपीएलमध्ये द्वितीय क्रमांक हरी ओम डोलवी-पेण (दोन लाख एक रुपये व चषक), तृतीय वीर मराठा जोहे-पेण (एक लाख एक रुपये व चषक), चतुर्थ दिनेश स्मृती कुंडेवहाळ-पनवेल आणि पाचवा मेघनाथ म्हात्रे प्रतिष्ठान शिरढोण-जासई, रिया 11-कर्जत, वैष्णवी 11 कोलाड-रोहा आणि जीवदानी एनसीसी बामनडोंगरी-उलवे नोड (प्रत्येकी 50 हजार एक रुपये व चषक) यांनी पटकाविला.
स्पर्धेत मालिकाविर सुमित ढोंगरे (विचुंबे-देवद 11) ठरला. त्याला एफझेड बाईक देण्यात आली. उत्कृष्ट फलंदाज ओंकार हरपाल (डोलवी), उत्कृष्ट गोलंदाज जयेश खैरकर (कोलाड), तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक समाधान वास्कर (कुंडेवहाळ) ठरला. या तिघांनाही स्पोर्ट्स सायकल देण्यात आली.
पारितोषिक वितरण समारंभास रायगड जि. प.चे विरोधी पक्षनेते तथा भाजप नेते वैकुंठ पाटील, भाजप पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, नवघर जि. प. विभागीय अध्यक्ष महेश कडू, वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे, शिरढोणच्या सरपंच साधना कातकरी, उपसरपंच संगीता चौधरी, सदस्य गजानन घरत, विजय भोपी, प्रमोद कर्णेकर, भाऊ वाजेकर, निकीता चौधरी, सानिका कातकरी, मोनाली घरत, रेश्मा वाजेकर,प्रितेश मुकादम, तसेच प्रवीण काळबागे, भाजप नेते गणेश पाटील, बाळूशेठ पाटील, युवा मोर्चा केळवणे जि. प. विभागीय अध्यक्ष रोशन पाटील, पं. स. विभागीय उपाध्यक्ष सुबोध ठाकूर, रायगड क्रिकेट ग्रामीण अध्यक्ष राकेश गायकवाड, तेजस म्हात्रे, संदीप पाटील, पनवेल समालोचन असोसिएशन अध्यक्ष मच्छिंद्र पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply