अलिबाग ः प्रतिनिधी
पनवेल तालुक्यातील शिरढोण येथील रायगड प्रीमियर लीग (आरपीएल) संपते न् संपते तोच आणखी एक आरपीएल सुरू झाली आहे. या 25 वर्षांखालील मुलांसाठीच्या टी-20 क्रिकेट स्पर्धचे अलिबाग तालुक्यातील कुरूळ येथील क्षत्रीय माळी समाजाच्या हॉलमध्ये उत्साहात उद्घाटन करण्यात आले. रायगड जिल्ह्यात लेदर बॉल क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात स्पर्धेचे आयोजन होत आहे.
आरपीएल स्पर्धेत सहभागी आठ संघांना गड-किल्यांची नावे देण्यात आली आहेत. प्रत्येक संघाचा एक संघमालक, प्रशिक्षक, व्यवस्थापक असून 18 खेळाडूंचा ताफा असेल. प्रत्येक संघातील खेळाडूंसह, सामनाधिकारी, पंच, गुणलेखकांना आयोजकांकडून स्पोर्ट्सवेअर कपडे देण्यात आले आहेत.
स्पर्धेतील विजेत्या संघाला 80 हजार रुपये व आकर्षक चषक, तर उपविजेत्या संघाला 70 हजार रुपये व आकर्षक चषक देण्यात येईल. ही स्पर्धा उरण येथील जेएनपीटी व रसायनी येथील एनआयएसएमच्या टर्फ पीच असलेल्या हिरव्यागार मैदानावर खेळवण्यात येणार आहे. संपूर्ण स्पर्धा यू-ट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह दिसणार आहे. स्पर्धेचा बॉल टू बॉल स्कॉर क्रिक-हिरोज अॅपद्वारेसुद्धा पाहायला मिळणार आहे.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …