Breaking News

सिडको घेराव आंदोलनाच्या बैठकांना प्रतिसाद; सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी 10 जूनला झालेल्या जोरदार आणि यशस्वी मानवी साखळीच्या आंदोलनानंतर आता 24 जूनच्या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्याअंतर्गत नवीन पनवेल आणि खांदा कॉलनी येथे आंदोनलाच्या पूर्वतयारीसाठीच्या बैठका पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थित सोमवारी (दि. 21) झाल्या. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी 24 जूनला  सिडको घेरावा घालण्यात येणार असून, त्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. तसेच या आंदोलनात किमान 1 लाख लोकांचा सहभाग असणार आहे. त्यापार्श्वभुमीवर पंचायत समिती निहाय बैठका नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या मार्फत घेण्यात येत आहे. त्याअंतर्गत सोमवारी खांदा कॉलनी येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आणि नवीन पनवेल येथील सीकेटी स्कूल येथे झालेल्या या बैठकांना महापौर डॉ. कविता चौतमोल, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, नगरसेवक एकनाथ गायकवाड, अ‍ॅड. मनोज भुजबळ, नगरसेविका चारुशिला घरत, राजश्री वावेकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील घरत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, पनवेल शहर सरचिटणीस अमरिश मोकल, माजी नगराध्यक्षा स्मिता वाणी, विजय म्हात्रे, मोतीलाल कोळी, जगदिश घरत, रवि नाईक, शांताराम महाडिक, राकेश पिंपळे, अभिषेक भोपी, गोपीनाथ मुंडे, प्रकाश खानावकर, रामनाथ पाटील, सचिन गायकवाड आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply