उरण : वार्ताहर
दिवाळीनंतर येणारा महत्त्वाचा सण म्हणजेच तुळशीविवाह, तुळशीविवाहानंतर लग्नाचे मुहूर्त सुरू होतात. कार्तिकी एकादशीनंतर तुळशी विवाहाला सुरुवात होते. उरण तालुक्यातील ठिक-ठिकाणी तुळशीविवाहाला सुरुवात झाली आहे. एकादशीपासून सुरू होणारे हे विवाह पाच दिवस चालतात. कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा विधी चालतो. उरण तालुक्यात तुळशी विवाह मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तुळशीविवाहापूर्वी तुळस आधीरगीबेरंगी रंगानी रंगवली जाते नवरीची प्रतिकृती बनवून त्याला कपडे परिधान केले जातात. ऊसाचा मांडव केला जातो. गाठी, बांगडी, संपूर्ण घर आणि अंगण दिव्यांनी हळकुंड, खजूर, वेणी, नारळ, प्रकाशमान होते. तुळशीला स्नान आवळा, चिंच, बोर, फळ याने ओटी घालून तिच्या पुढ्यात रांगोळी घालून भरली जाते. तुळशी विवाहादिवशी दिवा पेटवला जातो. यंदा लग्नसराई मोठ्या प्रमाणात संध्याकाळच्या वेळी तुळशी मातेला विवाहासाठी अगदी वधूच्या रुपातसजवले जाते. फुलांच्या माळांनी तुळस शोभून दिसते. हिंदू धर्मात तुळशी विवाहानंतर लग्नांना सुरुवात होते. उरण नगरपरिषद हद्दीतील पंचवटी बिल्डींग येथे राहणारे यशवंत पाटील यांनी लग्न सोहळ्याप्रमाणेच तांदुळाच्या अक्षदा देऊन तुलशी सोहळा पार पडला.