Monday , February 6 2023

मीराबाई चानूला सुवर्णपदक

दोहा : वृत्तसंस्था
माजी जागतिक विजेती वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानूने कतार आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेतील महिलांच्या 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.
ऑलिम्पिक पात्रता प्रकारात चानूने 194 किलो वजन उचलत जेतेपदाला गवसणी घातली. टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेची अंतिम क्रमवारी जाहीर झाल्यानंतरच पात्रता स्पष्ट होऊ शकेल.
2018च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणार्‍या 24 वर्षीय मीराबाईने स्नॅच व क्लीन अँड जर्क प्रकारात प्रत्येकी एकदाच यशस्वी वजन उचलले. स्नॅच प्रकारात 83 किलो व क्लीन अँड जर्क प्रकारात 111 किलो वजन उचलले. फ्रान्सच्या अ‍ॅनाइस मायकेल (172 किलो) आणि मेनन लॉरेंट्झ यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले.
मीराबाईची 201 किलो ही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी आहे. चालू वर्षाच्या पूर्वार्धात झालेल्या जागतिक अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत तिने ही किमया साधली. तिने स्नॅचमध्ये 87 किलो व क्लीन अँड जर्क प्रकारात 114 किलो वजन उचलले होते.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply