Breaking News

अवकाळी पावसाने मोठे नुकसान

चौल-रेवदंड्यातील सुपारी व्यापारी, बागायतदार हवालदिल

रेवदंडा : प्रतिनिधी

अवकाळी आलेल्या पावसामुळे चौल-रेवदंड्यातील सुपारी व्यापारी व बागायतदाराचे अतोनात नुकसान झाले.

अवकाळी पावसाने बेसावध असलेले बागायतदारांच्या सुपारीस पाणी लागल्याने त्यांना मोठी झळ बसली आहे.  झाडावरून उतरवण्यात आलेल्या सुपार्‍यांना पाणी लागल्याने सुपारीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे व्यापार्‍यांना अगदी कमी किमतीत सुपारी द्यावी लागेल, असे येथील बागायतदारांनी सांगितले. दरम्यान, सुपारी व्यापार्‍यांनी स्वत:च्या फंडात ठेवलेली सुपारी पावसाने भिजल्याने त्यांनाही मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.

रेवदंडा व चौलमधील घाऊक व्यापारी बागायततीतून सुपारी खरेदी करतात, फंडाच्या माध्यमातून ही खरेदी केलेली सुपारी उन्हात ठेवून सुकवली जाते. परंतु अवकाळी पावसाने या सुपारीस पाणी लागल्याने तिला  योग्य भाव मिळणार नसल्याचे येथील सुपारी व्यापारी सुरेश घरत कोटकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply