कराची : वृत्तसंस्था
26/11 मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा ऑपरेशन कमांडर जकी-उर-रहमान लखवी याला पाकिस्तानात अटक झाली आहे, मात्र या अटकेचा मुंबई हल्ल्याशी संबंध नाही.
दहशतवाद्यांना मदत करणे आणि त्यांना फंडिंग केल्याप्रकरणी लखवीवर ही कारवाई करण्यात आली आहे. लखवीने हाफीज सईदसोबत मिळून 26/11 च्या हल्ल्याचा कट रचला होता.
लखवीला मुंबई हल्ल्यानंतर 2008मध्ये यूएनएससीच्या प्रस्तावानुसार संयुक्त राष्ट्रांद्वारे जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले होते. मुंबई हल्ल्याच्या तपासादरम्यान हे स्पष्ट झाले होते की लखवीनेच हाफीज सईदला दहशतवादी हल्ल्याची संपूर्ण योजना आखून दिली होती. सुमारे सहा वर्षे तुरुंगात घालविल्यानंतर एप्रिल 2015मध्ये लखवीची पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटका करण्यात आली होती.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …