Breaking News

उरणमधील शिवस्मारक 1 डिसेंबरपासून खुले

जेएनपीटी उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांची माहिती

उरण : वार्ताहर

रायगड जिल्ह्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्राची शान ठरू पाहणार्‍या उरण येथे जेएनपीटीने 32 कोटी खर्चून उभारलेल्या लाखो दासभक्तांना उत्कंठा लागून राहिलेले ऐतिहासिक भव्य-दिव्य अस 20 मीटर उंचीचे शिवस्मारक पर्यटकांसाठी 1 डिसेंबरपासून खुले करण्यात येणार असल्याची माहिती जेएनपीटी उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांनी दिली. हे शिवस्मारक उरण पनवेल रस्त्यावर जासईजवळ उभारण्यात आले आहे.

जेएनपीटीने उभारलेल्या शिवरायांच्या पराक्रमाची गाथा सांगणारे मेमोरियल म्युझियम शिवस्मारकाचे अडीच वर्षांपूर्वी लोकार्पण करण्यात आले आहे. विविध सुविधा असलेल्या अत्याधुनिक भव्य दिव्य स्मारकाची मागील अडीच वर्षांपासून देशभरातील शिवप्रेमी, दासभक्त, पर्यटक आणि नागरिक आदी सर्वांनाच मोठी प्रतीक्षा लागून राहिली होती.

कोविड काळात बंद ठेवण्यात आलेले 20 मीटर उंचीचे बहुचर्चित शिवस्मारक पर्यटकांसह सर्वांसाठीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. उरण तालुक्यातील जासई-दास्तानफाटा दरम्यान जेएनपीटी प्रशासनाने 32 कोटी खर्चून 19.3 मीटरउंचीचे भव्य शिवस्मारक नऊ हजार चौरस मीटर क्षेत्रात उभारण्यात आले आहे.

पाच मजल्यांपर्यंत 7 फेब्रुवारी 2019 रोजी या शिवस्मारकाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत झाले होते. कोविडदरम्यान संग्रहालय बंद होते, मात्र 1 डिसेंबरपासून हे शिवस्मारक पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे.

उभारण्यात आलेल्या शिवस्मारकाच्या तळमजल्यावर 480 चौरसमीटरचा भव्य बहुउद्देशीय सभागृह आहे. या सभागृहात कॅन्टीन, ग्रीनरूम आणि संग्रहालय उभारण्यात आले आहे. या संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. पहिल्या मजल्यावर दोन खुल्या बाल्कनीमधून परिसर न्याहाळता येतो.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply