खोपोली : प्रतिनिधी
खोपोली शहर भाजप व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सेवा पंधरवड्यानिमित्त रक्तदान शिबिर, ई-श्रम आधार कार्डचे वाटप, सत्कार अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमामध्ये ज्या नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेतला आहे अशा एकुण 200 लाभार्थींना माजी आमदार तसेच भाजपचे कर्जत विधानसभा अध्यक्ष देवेंद्र साटम यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच 150 ई-श्रम आधार कार्डचे वाटप करण्यात आले. लोहाणा सभागृहात रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर नगरपालिका रूग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.
या वेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पुरी, अॅड. राजेंद्र येरूणकर, गटनेते तथा नगरसेवक तुकाराम साबळे, नगरसेविका अपर्णा मोरे, शहर सरचिटणीस हेमंत नांदे, ईश्वर शिंपी, शहर उपाध्यक्ष दिलीप पवार, प्रमोद पिंगळे, जिल्हा कामगार आघाडी उपाध्यक्ष सूर्यकांत देशमुख, युवा मोर्चा अध्यक्ष अजय इंगुळकर, सरचिटणीस विनायक माडपे, उपाध्यक्ष पुनीत तन्ना, पंकज पलांडे, सिद्धेश पाटील, हेमंत भाटिया, अभिनव पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा शोभा काटे, माजी नगरसेविका अनिता शाह, सरचिटणीस अश्विनी अत्रे, स्नेहल सावंत, स्वाती बिवरे आदी उपस्थित होते.