पनवेल : रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि अखिल भारतीय नाट्य परिषद पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही पनवेलमध्ये सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या दिवाळी पहाट संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. 23) सकाळी 6 वाजता पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे हा कार्यक्रम होणार आहे.
यंदा दिवाळी पहाट कार्यक्रमाचे सहावे वर्ष असून यामध्ये ‘झी मराठी लिटिल चॅम्प’ फेम प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, शमिका भिडे तसेच ‘सूर नवा ध्यास नवा’ स्पर्धक प्रणय पवार ही प्रसिद्ध गायक मंडळी सुश्राव्य गाण्यांची मैफिल सादर करणार आहेत, तर या कार्यक्रमाचे निवेदन प्रसिद्ध निवेदिका धनश्री दामले करणार आहेत. दरवर्षी संगीत रसिकांचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असतो.
या कार्यक्रमासाठी प्रवेश निःशुल्क असून प्रवेशिकेसाठी रोहित जगताप (8691930709), गौरव कांडपिळे (9920868008) किंवा अभिषेक भोपी (9820702043) यांच्याशी संपर्क साधावा तसेच या सुरेल मैफलीचा संगीत रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष व पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले आहे.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …