Breaking News

पनवेलमध्ये मोफत ई-श्रम कार्ड वाटप

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवस तालुक्यात विविध कार्यक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्याअंतर्गत भाजप युवा मोर्चा पनवेलच्या वतीने वाढदिवसाचे औचित्यसाधून मोफत ई-श्रम कार्ड वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी (दि. 25) करण्यात आले होते. या कार्यक्रमात अरुणशेठ भगत यांच्या हस्ते ई-श्रम कार्डचे वाटप करण्यात आले.

ई-श्रम कार्ड ही आणखी एक महत्त्वकांशी योजना केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या कामगार व रोजगार मंत्रालयामार्फत राबवली जात आहे. त्यानुसार भाजप युवा मोर्चा पनवेल यांच्यावतीने पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून ई-श्रम कार्ड वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार भाजपच्या पनवेल येथील मध्यावर्ती कार्यालयात गुरुवारी अरुणशेठ भगत यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या कार्डांचे वापट करण्यात आले.

या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, जिल्हा सचिव चिन्मय समेळ, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, भाजप नेते चंद्रकांत मंजुळे, ई-श्रम कार्डचे पनवेल संयोजक कादिर शेख, आत्मनिर्भर भारतचे संयोजक आकाश भाटी, कोषाध्यक्ष देवांशू प्रभाळे तसेच उमेश पोतदार, रोहित कोळी, सिद्धार्थ मोहिते आदी उपस्थित होते.

कोरोना महामारीच्या काळात भाजपच्या पदाधिकार्‍यांनी तसेच युवा मोर्चाने जीवाची पर्वा न करता गोरगरीब जनतेची सेवा करत प्रेरणा देण्याचे काम केले आहे. युवा मोर्चाने वाढदिवसानिमित्त हा सेवाभावी उपक्रम राबवल्याबद्दल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी आभार मानले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply