Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या महिलांचा सत्कार

खारघर : रामप्रहर वृत्त

खारघर-तळोजा मंडल भाजप महिला मोर्चा आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त खारघर शहरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या पाच कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सन्मानचिन्हे, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.

1)चारूलता अभय डोणगावकर-(दिव्यांग सेवा)उच्च शिक्षित, स्वमग्नता या विषयात प्राविण्य असलेल्या व सतीश हावरे दिव्यांग सेंटर मध्ये प्रिन्सिपल म्हणून सेवा बजावणार्‍या तसेच स्वतःच्या मुलांप्रमाणे दिव्यांगाची सेवा करण्याचे कार्य, 2) मीना तातोबा बनसोडे-(वरीष्ठ पोलीस निरीक्षक व समुपदेशक) गुन्हेगारांची कर्दनकाळ, उत्कृष्ट तडीपार अधिकारी म्हणून ओळख असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक या कौटुंबिक अत्याचार, महिलांच्या समस्या, पती पत्नी मधील वादाची 690 प्रकरणे यशस्वी हाताळून कुटुंब जोडण्याचे महत कार्य, 3) मीना श्रीकांत मलिक-(अबोली रिक्षा चालक) मागील 4 वर्षांपासून पुरुषांची मक्तेदारी असलेल्या रिक्षा व्यवसायात पदार्पण करून कुटुंबाची जबाबदारी सांभाळणार्‍या व विद्यार्थी, जेष्ठ नागरिकांना सेवा देण्याचे कार्य, 4)विमल सुनील पवार-(स्वच्छता दूत) संत गाडगेबाबा यांचा आदर्श ठेवून स्वच्छता दूत म्हणून काम करताना स्वच्छतेचा संदेश नागरिकांना पोचवण्याचे कार्य, 5) सुखविंदर कौर कांग-(मिसेस इंडिया) सौंदर्य व बुद्धिमत्ता यांचा सुरेख संगम असलेल्या मिसेस इंडिया पॉप्युलरची विजेती व मिसेस विश्वसुंदरी ची उपविजेती असलेल्या या महिलेने खारघरचे नाव देशविदेशात रोशन केले. समाजात महिलांचे महत्त्व, त्यांचा त्याग, त्यांचे समर्पण व वर्षभर कुटुंबाच्या धावपळीतून थोडा विरंगुळा म्हणून भव्य डबल विकेट क्रिकेटच्या माध्यमातून आनंद देण्याचा प्रयत्न खारघर-तळोजा मंडल महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आला. शहरातील सुमारे 150 महिलांनी या स्पर्धेत

भाग घेतला.

या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक रितू शर्मा व स्मिता पाटील 5001 रुपये व आकर्षक ट्रॉफी, द्वितीय क्रमांक प्राची म्हात्रे व कुंदा घेमुड 3001 रुपये व आकर्षक ट्रॉफी, उत्कृष्ट फलंदाज रितू शर्मा 3001 रुपये व सन्मानचिन्ह, उत्कृष्ट गोलंदाज पूजा मांगोरे 3001 रुपये व सन्मानचिन्ह, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुनीता मोरे 3001 रुपये व सन्मानचिन्ह, उत्कृष्ट डान्सर प्रिती मोहिते 3001 रुपये व सन्मानचिन्ह अशी विविध बक्षिसे वाटण्यात आली. हजारो महिलांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, खारघरमधील सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply