चौक : रामप्रहर वृत्त
विद्याप्रसारिणी सभा या संस्थेच्या चौक येथील सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयामध्ये बुधवारी (दि. 12) राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. संस्थेच्या कार्याध्यक्षा शोभाताई देशमुख यांनी प्रतिमांचे पूजन करून राजमाता जिजाऊंच्या कार्याचे महत्त्व सांगितले. संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्र शहा यांनीही मनोगत व्यक्त केले, तसेच रेखा आंबवणे व हर्षदा जाधव यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्ज्वला देशमुख शाळेचे मुख्याध्यापक बादशा भोमले, उपमुख्याध्यापिका कांता पुजारी, पर्यवेक्षक दिलीप मोळीक, प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सुलभा गायकवाड यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या वेळी उपस्थित होते. साधना माळी यांनी आभार मानले.
रोहे : तालुक्यातील धाटाव येथील एम. बी. मोरे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे बुधवारी (दि. 12) राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. या वेळी प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रा. नरेश घाग यांनी जिजाऊ आणि विवेकानंद यांच्या कार्याची महती सांगितली. राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. मयूर पाखर यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य प्रसन्ना म्हसळकर, प्रा. दर्शना शिंदे, प्रा. प्रणाली महाडिक, प्रा. योगिता नेहेते, प्रा. निकिता महाडिक, प्रा. कविता कांबळे आदी उपस्थित होते.
मुरूड : येथील नगर परिषद कार्यालयात बुधवारी (दि. 12) राजमाता जिजाऊ आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. नगर परिषदेचे माजी पाणीपुरवठा सभापती पांडुरंग आरेकर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रशासकीय अधिकारी परेश कुंभार, वरिष्ठ लिपीक नरेंद्र नांदगावकर, आरोग्य अधिकारी राकेश पाटील, दीपक शिंदे यांच्यासह कर्मचारी या वेळी उपस्थित होते.