Breaking News

पनवेल परिसरातील पाणी प्रश्नासंदर्भात सिडकोने तातडीने उपाययोजना कराव्यात -आमदार प्रशांत ठाकूर

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
पनवेल परिसरातील पाणी प्रश्नासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि. 9) सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांच्यासोबत बैठक घेतली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाणीपुरवठ्याची समस्या मार्गी लागण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्याची सूचना केली.
पनवेलची पाणी समस्या मार्गी लागावी यासाठी आमदार प्रशांत ठाकूर सातत्याने प्रयत्नशील आहेत. या संदर्भात त्यांची आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांची गेल्या महिन्यात बैठक झाली होती. याच अनुषंगाने काही दिवसांपूर्वी त्यांनी महापालिका मुख्यालयात आयुक्त तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि सिडकोचे अभियंता यांची संयुक्त बैठक घेतली. या वेळी न्हावाशेवा टप्पा 3 योजनेचा आढावा घेत रखडलेली कामे पूर्ण करण्याच्या मागणीवर भर देण्यात आला होता.
यानंतर सिडको परिसरातील पाण्याच्या तुटवड्यासंदर्भात सोमवारी सीबीडी बेलापूर येथील सिडको भवनात बैठक झाली. खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेलचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने टेंडर काढून कामांना सुरुवात करावी, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी सांगितले. त्याचप्रमाणे प्रत्येक सिडको नोड, सेक्टरमध्ये प्रत्यक्षात किती पाण्याची आवश्यकता आहे आणि पुरवठा किती होतो याची माहिती घेऊन तसे नियोजन करावे. जीर्ण वाहिन्या व इतर दुरूस्ती करावी. त्याचप्रमाणे जेव्हा गरज भासते तेव्हा प्लॅट, रहिवाशांच्या संख्येनुसार टँकरचे नियोजन करावे, कामोठ्यासारख्या भागासाठी मुख्य पाणीपुरवठा बंद असेल तेव्हा पर्यायी स्रोताची तयारी ठेवावी यांसारख्या उपाययोजना अमलात आणण्याचे सूचित करण्यात आले.
या बैठकीला भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप जिल्हा सरचिटणीस व माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, नितीन पाटील, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, कळंबोली मंडल अध्यक्ष रविशेठ पाटील, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, हरेश केणी, डॉ. अरुणकुमार भगत, एकनाथ गायकवाड, समीर ठाकूर, शत्रुघ्न गायकवाड, नरेश ठाकूर, बबन मुकादम, अमर पाटील, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, किर्ती नवघरे, सचिन वास्कर, प्रभाकर जोशी, जयदास तेलवणे, जगदिश घरत, इर्शाद शेख, साजिद पटेल, मोहन म्हात्रे तसेच सिडको पाणीपुरवठा विभागाचे मूळ, गायकवाड आदी उपस्थित होते.

Check Also

अलेक्झांड्रा थिएटरची इमारत झाली 103 वर्षांची

आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढी मुव्हीज (आजची युवा पिढी चित्रपटाला मुव्हीज म्हणते) पाहण्यासाठी मल्टीप्लेक्स, मोबाईल …

Leave a Reply