Breaking News

रान अळंबी बाजारात दाखल

माणगाव : प्रतिनिधी – पावसाळ्यात उगवणार्‍या रान भाज्यांपैकी खवय्यांची पसंती असलेली रान अळंबी बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. भूछत्रसारख्या असलेली ही अळंबी पावसाळ्यातील ठराविक दिवसांतच उगवते. त्यामुळे या अळंबीला बाजारपेठेत चांगली मागणी असते.

पावसाळ्यातील विशिष्ट दिवसांत रानात उगवणारी अळंबी रुचकर असते. त्यामुळे खवय्यांची या अळंबीला पसंती असून, अनेक जण तिची आतुरतेने वाट पाहत असतात. श्रावण महिन्याच्या सुरुवातीला रानावनात मूबलक प्रमाणात अळंबी उगवते. ग्रामीण भागातील शेतकरी, आदिवासी महिला अळंबी वेचून बाजारपेठेत विक्रीसाठी आणत आहेत. दुर्मिळ व महाग असलेली अळंबी 100 रुपये वाटा या प्रमाणे विकली जात आहेत. यातून आदिवासी महिलांना चांगली रोजीरोटी मिळत असून, खवय्यांनाही ताजी व रूचकर अळंबी मिळत आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply