Breaking News

दीपक मोकल यांना राष्ट्रीय खेळ गौरव पुरस्कार प्रदान

रेवदंडा : प्रतिनिधी
येथील क्रीडाशिक्षक दीपक मोकल यांना नुकतेच राष्ट्रीय खेळ गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय खेळ विकास परिषदेच्या वतीने देण्यात येत असलेला हा पुरस्कार नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय डायरेक्ट व्हॉलिबॉल स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या वेळी अखिल भारतीय डायरेक्ट व्हॉलिबॉल असोसिएशनचे अध्यक्ष विपिन चहल, उपाध्यक्ष तथा राज्याचे अध्यक्ष प्रा. डी. बी. सांळुके, राष्ट्रीय महासचिव विक्रम सिंग, योगेंद्र दोरकर आदी उपस्थित होते.
अखिल भारतीय डायरेक्ट व्हॉलिबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा राज्य असोशिएशनचे जनरल सेके्रटरी म्हणून कार्यरत असलेले दीपक मोकल यांना यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply