पुणे : प्रतिनिधी
ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे गुरुवारी (दि. 27) दीर्घ आजाराने निधन झाले आहे. पुण्यातील पत्रकारनगर येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 78 वर्षांचे होते. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अनिल अवचट यांनी केवळ साहित्यविश्वच नाही, तर समाजातही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. व्यसनींना भरकटलेल्या मार्गावरून व्यसनमुक्त करीत नव्याने आयुष्य जगता यावे यासाठी त्यांनी मुक्तांगण या व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात केली. अवचट हे एक डॉक्टर व पत्रकार होते. त्यांनी समाजसेवेतही मोलाचे योगदान दिले. 1969मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक ‘पूर्णिया’ हे प्रसिद्ध केले होते, तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केलं. त्यांची 38हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …