Breaking News

यंदा रानमेवा झाला गायब

लॉकडाऊनमुळे विक्रीसाठी अडचणी

नवी मुंबई ः प्रतिनिधी

सध्या कोणतेही फळ वर्षभर कधीही अगदी सहज मिळते. त्यामुळे त्या त्या हंगामात फळे खाण्याची रंगत आता कमी होत चालली आहे, मात्र असे असले तरी ताडगोळे, करवंदे, जांभूळ, पिवळा रानमेवा उन्हाळ्यातच मिळतो. त्यामुळे या फळांना या हंगामात चांगली मागणी असते, मात्र लॉकडाऊनमुळे हा रानमेवा शहरात तसेच नवी मुंबईच्या बाजारात पाहायलाही मिळत नाही.

मागच्या अनेक वर्षांपासून पनवेल, उरण परिसरातील डोंगराळ भागातून मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव हा रानमेवा घेऊन बेलापूर, वाशी भागात विक्रीसाठी येत होते, मात्र गेल्या काही वर्षांपासून या भागातील डोंगर नष्ट झाले आहेत. त्यामुळे ही झाडेही नष्ट झाली. परिणामी रानमेवा मिळेनासा झाला आहे. जी काही थोडी झाडे शिल्लक आहेत त्यातून येथील आदिवासी हा रानमेवा घेऊन बाजारात येत आहेत, मात्र मागणी अधिक आणि उत्पादन कमी अशी स्थिती निर्माण होते. रानमेव्याच्या विक्रीतून आदिवासींना दोन पैसे कमावता येतात, मात्र लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी वेळेचे बंधन असल्याने आदिवासींना रानमेवा विक्रीसाठी अडचणी येत आहेत.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply