Breaking News

रायगडातील पहिला हापूस आंबा मुंबई बाजारात; अलिबागच्या वरुण पाटील यांना मिळाला मान रवाना

अलिबाग : प्रतिनिधी

यंदाच्या हंगामात रायगड जिल्ह्यातून मुंबई बाजारात पहिला हापूस आंबा पाठविण्याचा मान अलिबाग तालुक्याला मिळाला आहे. तालुक्यातील नारंगी येथील बागायतदार एस. के. मँगोजचे मालक वरूण संजयकुमार पाटील यांनी प्रजासत्ताक दिनी प्रत्येकी दोन डझनाच्या पाच पेट्यांची काढणी करून आंबा मुंबई बाजारात पाठवला आहे. शिवाय एक केशरची पेटीही मुंबई बाजारात रवाना झाली आहे. यंदादेखील आंबा बागायतदारांवर निसर्गाने अवकृपा केली आहे. सातत्याने बदलत्या हवामानाचा फटका आंबा पिकाला बसतो आहे. अवेळी पडणारा पाऊस, खराब हवामान, पिकांवर येणारे आजार अशा प्रतिकुल परिस्थितीवर मात करून वरूण पाटील यांनी यशस्वीरित्या आंब्याची काढणी करून जिल्ह्यातून पहिला आंबा बाजारात पाठवण्याचा मान पटकावला आहे. हा आंबा त्यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी बाजारात पाठवला आहे. सुरूवातीला हापूसला डझनाला 10 हजार रूपयांपर्यंत भाव मिळू शकतो, असे वरूण पाटील यांनी सांगितले.

ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये अवकाळी पाऊस झाला. आम्ही योग्य फवारणी करून मोहर वाचवला. त्यामुळे आंबा लवकर तयार झाला. आपल्याकडील आंब्याला सुरूवातीला चांगला भावही मिळतो. सध्या डझनाला 10 हजार रुपये इतका भाव मिळू शकतो.

-वरुण पाटील, आंबा बागायतदार, नारंगी, ता. अलिबाग

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचे विशेष सन्माननीय सदस्यत्व प्रदान

पनवेल : प्रतिनिधी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर्धापन दिनानिमित्त संघाच्या पत्रकार भवनातील सभागृहात शुक्रवारी (दि.21) …

Leave a Reply