उरण : रामप्रहर वृत्त
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील क्रिडा विभागाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवानिमित्त ‘75 कोटी सुर्यनमस्कार’ या संकल्पात विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात योगा प्रशिक्षक पुनम चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार कसे करावे याविषयीचे तंत्र सांगितले व योगा व प्राणायामाचे धडे दिले. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बळीराम एन. गायकवाड यांनी निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने एक तास योगासने केले पाहिजे असे सांगितले. प्रा. के. ए. शामा, क्रिडा विभाग प्रमुख प्रा. एच. के.जगताप, आय.क्यु.ए.सी समन्वयक प्रा.डॉ.ए.आर. चव्हाण, प्रा.व्हि.एस.इंदुलकर आदी या कार्यक्रमात उपस्थित होते. एकूण 65 शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 75 याप्रमाणे 4875 सुर्यनमस्कार केले. या वेळी उपस्थितांनी दररोज सुर्यनमस्कार करण्याचा संकल्प केला.