Breaking News

वाढत्या उन्हाच्या काहिलीवर गारेगार ताडगोळ्यांना मागणी; उरणमध्ये अनेक ठिकाणी विक्री

उरण : वार्ताहर

उरण तालुका हा निसर्गसंपन्न तालुका म्हणून ओळखला जातो. मच्छि, विविध प्रकारची फळे यासाठी उरण तालुका प्रसिद्ध आहे. यासोबतच उरण तालुक्यातील ताडगोळे हेदेखील प्रसिद्ध आहेत. अत्यंत ताजे आणि चविष्ट ताडगोळे उरणमध्ये मिळतात. सध्या उरण शहरात अनेक शेतकरीविक्रेते हे ताजे ताडगोळे विकण्याकरीता अनेक ठिकाणी बसलेले असल्याचे दिसून येते. नुकतेच हा ताडगोळ्यांचा हंगाम सुरू झाला आहे. सध्यारात्रीची थंडी आणि दिवसा कडक उन असे वातावरण असल्याने नागरिकांकडून या ताडगोळ्यांना चांगली मागणी आहे. उन्हाळ्यात घामाच्या धारानी अंगाची पार लाही लाही होत असते. शरीराला थंडावा मिळावा त्याकरिता सर्व जण आपल्या परीने नवनवीन पर्याय शोधत असतात. उन्हाळी फळे आणि रानमेवा ही काही प्रमाणात गारवा देत असले तरी गारेगार ताडगोळ्यांना मात्र तोड नाही. ताडगोळा हा थंड असतो. त्यामुळे त्यामुळे उन्हाच्या काहिलीपासून थंडावा मिळण्यासाठी ताडगोळ्यांना विशेष मागणी असते. सध्या उरण शहरसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात ताड गोळ्यांची विक्री होताना दिसत आहे. जानेवारी ते जून महिन्याचे पहिल्या आठवड्यांपर्यंत ताडगोळ्यास मागणी असते. उरण शहरातील गणपती चौक, गांधी चौक, राजपाल नाका, आनंदनगर आदी ठिकाणी ताडगोळे विकतात.सध्या ताडगोळे डझन 120 ते 140 रुपये या दराने विकले जात असून उरणच्या ताडगोळ्यांना मोठी मागणी आहे, असे केगाव दांडा येथील जगदीश पाटील यांनी सांगितले.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply