Breaking News

द्रोणागिरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव दुर्ग मावळा प्रतिष्ठानचा पुढाकार

उरण : वार्ताहर

सालाबादप्रमाणे यंदाही दुर्ग मावळा प्रतिष्ठान या गड किल्ल्याचे संवर्धन, संरक्षण करणार्‍या संस्थेतर्फे उरण तालुक्यातील ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 18 व 19 फेब्रुवारी असे दोन दिवस शिवजन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. आगरी कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था, सह्याद्री प्रतिष्ठान उरण विभाग, शिवभक्त प्रतिष्ठान उरण विभाग, शिवशक्ती मित्र मंडळ उरण चारफाटा, योगा विथ पूनम ग्रुप, यान्सी ग्रुप ऑफ लिव्हीस टीम, युवा शिवशक्ती मित्र मंडळ डाऊरनगर, शिवछत्रपती मित्र मंडळ करंजा, अवनी सामाजिक संस्था उरण, डाऊर नगर ग्रामस्थ आणि मित्र परिवार आदी संस्था या उत्सवात सहभागी होणार आहेत. या उत्सवात शुक्रवारी (दि. 18) दुपारी वाजता द्रोणागिरी गडाची साफसफाई, गडावरील कुंडातील पाणी घेऊन खाली उतरणे, विमला तलाव येथे महाराजांच्या मूर्तीचे अभ्यंग स्नान, द्रोणागिरी गडाबद्दल माहिती आणि इतिहास वर्णन, रात्री 10 वा. मशाल फेरी आणि विमला तलाव येथे दीपोत्सव तसेच शनिवारी (दि. 19) सकाळी 7 वाजल्यापासून विविध कार्यक्रम असे दोन दिवस विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिवजन्मोत्सवात सहभागी होण्यासाठी दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply