Breaking News

खोपोलीतील आठवडा बाजार बंद

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी

शहरात दर गुरुवारी भरणारा आठवडा बाजार खोपोलीसह संपूर्ण खालापूर तालुक्यातील नागरिकांसाठी घरगुती व कौटुंबिक उपयोगी वस्तू, कपडे एकाच ठिकाणी उपलब्ध असण्याचे केंद्र आहे. त्यामुळे गुरुवार बाजारात प्रचंड गर्दी होते. मात्र कोरोना व्हायरसची गडद बनलेली काळी छाया बघता नगरपालिका व पोलीस प्रशासनाने एकत्रित निर्णय घेऊन खोपोलीत गुरुवारी भरणारा आठवडा बाजार अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवार बाजार म्हणजे खोपोलीतील सर्वात मोठया प्रमाणावर गर्दीचे ठिकाण, या निमित्ताने मुंबई, उल्हासनगर व अन्य ठिकाणाहून व्यापारी येऊन येथे दुकाने लावतात. कोरोना आजाराची वाढलेली गडद छाया बघता, खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरपालिका प्रशासनाकडे गुरुवारचा आठवडा बाजार बंद करण्याची मागणी केली होती. नगरपालिका प्रशासनाकडूनही या संदर्भात पोलीस, व्यापारी व बाजार संबंधित अन्य घटकांशी बाजार बंद ठेवण्याबाबत चर्चा सुरू होती. या सर्व पार्श्वभूमीवर व कोरोना आजाराचा फैलाव रोखण्यासाठी नगरपालिकेकडून 12 मार्चपासून पुढील सूचना प्राप्त होइपर्यंत अनिश्चित काळासाठी आठवडा बाजार बंद ठेवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली. या निर्णयामुळे मोठे नुकसान होणार असल्याने काही व्यापार्‍यांनी गुरुवारचा आठवडा बाजार बंद ठेवण्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. मात्र कोरोना आजाराची उग्रता व लोकहीत समोर ठेवत बाजार बंद ठेवण्याचा निर्णयाला एकमुखी पाठिंबा व सहकार्य करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply