अहमदाबाद : येथील तिसर्या कसोटी सामन्यात गुजरातचा लोकल बॉय अक्षर पटेल याने इंग्लंडच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवले. पहिल्या डावात बुधवारी (दि. 24) पहिल्याच दिवशी पटेलने अचूक टप्यावर मारा करीत इंग्लंडच्या सहा फलंदाजांना माघारी धाडण्याचा पराक्रम केला. त्याला अनुभवी आर. अश्विनने चांगली साथ देत तीन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला, तर 100वा कसोटी सामना खेळणार्या इशांत शर्माने एक गडी बाद केला. भारतीय गोलंदाजांच्या अचूक मार्यापुढे इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या 112 धावांत संपुष्टात आला.
Check Also
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …