भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांचा पनवेल विधानसभा मतदारसंघात झंझावाती प्रचार सुरू आहे. यानिमित्ताने पदाधिकारी व कार्यकर्ते हे गावे, वसाहती, वाड्या, वस्त्या पिंजून काढत आहेत. अशाचप्रकारे मंगळवारी पेंधर, वावंजे, ढोंगर्याचा पाडा, नावडे, कोयनावेळे, घोट, नितळस, खैरणे, पालेखुर्द, देवीचा पाडा, कानपोली येथे प्रचारदौरा झाला. यामध्ये महिला मोर्चा पनवेल तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत व सहकारी महिलांनी सक्रीय सहभाग घेत आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले. त्याला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …