Breaking News

पनवेल तालुक्यात कोरोनाचे 38 नवे रुग्ण

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यात 38 नवीन रुग्ण 11 जणांची कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी (दि. 5) 29 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच सात रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तर पनवेल ग्रामीणमध्ये नऊ नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून चार रूग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीतील रूग्णांमध्ये कामोठ्यातील 12, खारघर तीन, नवीन पनवेलमधील सहा, कळंबोलीतील सहा, पनवेल आणि तळोजातील प्रत्येकी एक एका रूग्णाचा समावेश आहे. ग्रामीण मध्ये नऊ नवीन रुग्ण सापडले. त्यामध्ये पालीदेवद (सुकापूर) येथील चार, उलव्यातील दोन तर पळस्पे, विचुंबे, करंजाडे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा

समावेश आहे.

नवीन पनवेलमध्ये दिवसभरात सहा नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 93 झाली आहे. पनवेलमध्ये दरगाह येथे आणि तळोजा मन्नत कॉलनीत ही एक रुग्ण सापडला आहे. खारघर येथे तीन नवीन रुग्ण सापडल्याने खारघरमध्ये रुग्णाची संख्या 142 झाली आहे. कामोठे येथे 12 नवीन रुग्ण सापडल्याने तेथील रुग्णांची संख्या 241 झाली आहे. कळंबोलीमध्ये सहा रुग्ण सापडल्याने तेथील रुग्णांची संख्या 110 झाली आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 3095 टेस्ट करण्यात आल्या. 39 जनाचे रिपोर्ट बाकी असून 637 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 364 रुग्ण पूर्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 246 जणांवर उपचार सुरू असून 27 जणाचा मृत्यू झाला आहे. रुग्ण बारे होण्याचे प्रमाण 57.14 टक्के आहे. 

पनवेल ग्रामीणमध्ये दिवसभरात आढळलेल्या रूग्णांमध्ये पालीदेवद (सुकापूर) येथील चार, उलव्यातील दोन तर पळस्पे, विचुंबे, करंजाडे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. पनवेल ग्रामीणमधील आजपर्यंतच्या एकूण 228 कोरोनाबाधित रूग्णांपैकी एकूण 158 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर नऊ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल ग्रामीणमध्ये कोरोनाच्या 61 अ‍ॅक्टीव्ह केसेस आहेत.

नवी मुंबईत 86 पॉझिटिव्ह; चार जणांचा मृत्यू

नवी मुंबई : नवी मुंबईत शुक्रवारी (दि. 5) कोरोनाचे 86 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर 78 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आणि चार जणांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची एकूण संख्या 87 झाली आहे. नवी मुंबईत आतापर्यंत एकूण दोन हजार 643 व्यक्ती पॉझिटिव्ह असून बरे होऊन परतलेल्यांची एकूण संख्या एक हजार 597 झाली आहे. त्यामुळे बरे होणार्‍या व्यक्तींचे प्रमाण 60 टक्के झाले आहे.सद्य स्थितीत 959 रुग्ण उपचार घेत आहेत. शुक्रवारी बाधितांची विभागवार आकडेवारी पाहिल्यास बेलापूर 7, नेरुळ 5, वाशी 7, तुर्भे 25, कोपरखैरणे 12, घणसोली 8, ऐरोली 19, दिघा 3 असा विभागवार रुग्णांचा समावेश आहे. 

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply